Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

‘फडणवीस राजकारणात आहेत तोवर महाराष्ट्राला सुख नाही’; संजय राऊतांची टीका

मुंबई | शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी उपमख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर बोचरी टीका केली आहे. महाराष्ट्रात जोपर्यंत देवेंद्र फडणवीस आहेत तोपर्यंत राज्यातील मराठी माणसाला सुख आणि शांतता लाभणार नाही, असं वक्तव्य ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केलं आहे.

खासदार संजय राऊत म्हणाले, महाराष्ट्रात नाटक, संगीत, चित्रपट, राजकारण याला खूप मोठी परंपरा आहे. मराठी माणसं नाटकांर आणि रंगभूमीवर प्रमेही करतात. त्याचप्रमाणे आपले जे नवे विष्णुदास आहेत. बारामतीचे विष्णुदास यासाठी म्हणायचं की विष्णुचे तेरावे अवतार दिल्लीत आहेत त्यामुळे विष्णुदास त्यांची नाट्यकला समोर आली आहे. अभिनय, कला, दिग्दर्शन, नेपथ्य हे पण बाहेर येईल. एकनाथ शिंदे मौलवीचा वेश धारण करून दिल्लीत गेले होते. आधी अहमद पटेलांना भेटायला गेले. त्यानंतर अमित शाह यांना भेटले, असं त्यांचेच लोक सांगत आहेत.

हेही वाचा      –      ‘उद्धव ठाकरेंनी मराठा आरक्षणाबाबत घेतलेली भूमिका दुर्दैवी’; प्रकाश आंबेडकरांची टीका

छगन भुजबळ बेळगावात सीमा प्रश्नाचा लढा दिला त्यासाठी वेशांतर केलं होतं. ते वेशांतर लोकांना आवडलं होतं. त्यांनी लाठ्या-काठ्या खाल्ल्या होत्या. असा प्रकारे राष्ट्रासाठी भूमिका वठवल्या आहेत. मात्र, या ज्या भूमिका समोर येत आहेत त्या काही बऱ्या नाहीत. हरून अल रशिदची पोरं आहेत की सगळी. तो वेशांतर करून फिरायचा. मी जी मागणी केली आहे की राष्ट्रीय सुरक्षा कशी धोत्यात आहे? याचं उत्तम उदाहरण एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांनी देशाला दाखवलं आहे. त्यावर काय कारवाई होणार? हा माझा सवाल आहे, असं संजय राऊत म्हणाले.

महाराष्ट्रात जोपर्यंत देवेंद्र फडणवीस आहेत तोपर्यंत राज्यातील मराठी माणसाला सुख आणि शांतता लाभणार नाही. त्यामुळे महाराष्ट्र सुखात शांततेत नांदवायचा असेल तर आम्हाला सत्तांतर घडवावं लागेल आणि जो कचरा आहे त्यांच्यावर खटले दाखल करावे लागतील. असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं आहे. तसंच मातोश्रीवर जे मराठा आंदोलक आले होते त्यात भाजपाचे पदाधिकारी होते असं विचारलं असता या प्रकारच्या राजकारणाला फडणवीस टच म्हणतात, असंही संजय राऊत म्हणाले.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button