Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

‘सर्वांनी एकत्र राहा, कसे निवडून येत नाही बघतो’; शरद पवारांचं साताऱ्यात विधान

Share On

सातारा | लोकसभा निवडणुकांमध्ये महाराष्ट्रात महायुतीची मोठी पीछेहाट झाल्याचं पाहायला मिळालं. तर दुसरीकडे महाविकास आघाडीतील मित्रपक्षांच्या मिळून ३१ जागा निवडून आल्या. या पार्श्वभूमीवर विधानसभा निवडणुकांकडे सगळ्यांचं लक्ष लागलं असताना शरद पवारांनी साताऱ्यात पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांसमोर बोलताना मोठं विधान केलं आहे.

शरद पवारांनी यावेली कार्यकर्त्यांना आवाहन केलं. तुम्हाला एवढंच सांगतो. तुम्ही एकत्र राहा, तुम्ही कसे निवडून येत नाही हे मी बघतो. तुमच्या सगळ्यांच्या मदतीने इथली निवडणूक आपण जिंकू, असं शरद पवार यावेळी म्हणाले.

हेही वाचा     –      मुंबईत पावसामुळे दाणादाण, मध्य रेल्वे, ट्रान्स हार्बरची वाहतूक विस्कळीत

महिन्या-पंधरा दिवसांत सगळे एकत्र बसून चर्चा करून मला येऊन सांगा. बारामतीत सांगा, नाहीतर पुणे-मुंबईत येऊन सांगा की आता आम्ही एक झालो आहोत. आमच्यापैकी कुणालाही तुम्ही संधी द्या, आम्ही त्याच्यासाठी काम करतो एवढं तुम्ही मला सांगा. या तालुक्याचा चेहरा बदलेल याची खात्री मी तुम्हाला देतो, असंही शरद पवार म्हणाले.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button