Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपुणेमहाराष्ट्रराजकारण
पुण्यातील मतमोजणीला ब्रेक, कसब्यातील मतमोजणीवर काँग्रेसचा आक्षेप

Lok Sabha Election Results 2024 | लोकसभा निवडणुकीच्या निकालाची मतमोजणी आज सुरू आहे. अवघ्या काही तासात देशाचा कारभार पुढील ५ वर्ष कोण सांभाळणार याचा फैसला होणार आहे. दरम्यान, पुण्यातून मोठी बातमी समोर येत आहे. पुण्याच्या कसब्यातील मतमोजणीवर काँग्रेसने आक्षेप घेतला आहे.
मतदानासाठी असणाऱ्या ईव्हीएम मशीनमध्ये ४ मिनिटं उशिराने आकडे दिसत असल्याचा आरोप काँग्रेसकडून करण्यात आला आहे. काँग्रेसने केलेल्या या आरोपानंतर कसब्यातील मतमोजणी काही वेळासाठी थांबवण्यात आल्याची माहिती मिळत आहे.
हेही वाचा – लोकसभेसाठी जनतेचा कौल कुणाला? जाणून घ्या तुमच्या जिल्ह्यातील आकडेवारी!
पाचवी फेरी अखेर पुणे लोकसभा भाजप एकूण ३४,८५१ मतांनी पुढे
मुरलीधर मोहोळ – १,४५,७४०
रवींद्र धांगेकर – १,११,८८९





