Instagram च्या ‘या’ भन्नाट फीचरमुळे एका झटक्यात वाढतील फॉलोअर्स!

Instagram | इंस्टाग्रामवर अनेक फीचर्स असे आहेत ज्यांची माहिती बहुतांश युजर्सना नाहीत. पण आज आपण इंस्टाग्रामच्या अश्याच एका फीचरची माहिती जाणून घेणार आहोत ज्याचा क्रिएटर्स आणि इन्फ्लूएंसरला फायदा होणार आहे. इंस्टाग्रामचं नवीन नोटिफाय फीचर तुमच्या इंस्टाग्रामच्या ग्रोथसाठी खूप उपयुक्त ठरू शकतं. या फीचरमुळे तुम्ही जास्तीत जास्त फॉलोअर्स वाढवू शकाल.
इंस्टाग्रामच्या ‘या’ फीचरमुळे वाढतील फॉलोअर्स :
ज्यावेळी तुम्ही रील पोस्ट कराल तेव्हा ती तुमच्या स्टोरीवर देखील शेयर करा.
हेही वाचा – आनंदाची बातमी! सोन्याच्या किंमतीत घसरण; जाणून आजचे दर
इथे वर दिलेल्या इमोजी आयकॉनवर क्लिक करा, तिथे तुम्हाला अनेक अस्फन दिसतील, यातील नोटिफायचा ऑप्शन सिलेक्ट करा. आणि स्टोरी पोस्ट करा.
यामुळे तुमच्या सर्व फॉलोअर्सकडे नोटिफिकेशन जाईल जेव्हा तुम्ही नवीन स्टोरी, रील पोस्ट शेयर कराल. तुमचे फॉलोअर्स त्यावर क्लिक करतील तेव्हा थेट तुमच्या पोस्टवर पोहोचतील.
अश्याप्रकारे जास्तीत जास्त लोकांपर्यंत नोटिफकेशन पोहचेल आणि जास्त लोक तुमच्या प्रोफाईलवर विजीट करतील आणि तुम्हाला फॉलो करतील.





