Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

शिंदे गटाचे १६ आमदार अपात्र झाल्यास प्लॅन बी तयार? मुख्यमंत्री बदलणार?

Share On

मुंबई : राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडी घडत असतानाच दुसरीकडे शिंदे गटाच्या विलिनीकरणाची भाजपकडून रणनीती आखली जात असल्याची माहिती समोर आली आहे. शिवसेना आमदार अपात्रतेचा निकाल देताना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिंदे गटातील १६ आमदारांना अपात्र ठरवल्यास भाजपने प्लॅन बी तयार ठेवल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे.

शिवसेनेच्या दोन्ही गटाने आपली बाजू सविस्तरपणे मांडली. संपुर्ण कागदपत्र, युक्तीवाद ऐकून घेतल्यानंतर येत्या १० जानेवारीला यासंदर्भात राहुल नार्वेकर निकाल देणार आहेत. मात्र या निकालाआधीच भाजपने मोठी रणनीती आखल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

हेही वाचा  –  ‘भारतात गेल्या ४० वर्षात आली नव्हती इतकी मोठी बेरोजगारी मागच्या दहा वर्षांमध्ये आली’; राहुल गांधींचा हल्लाबोल

शिंदे गटाच्या १६ आमदारांना अपात्र ठरवण्यात आलं किंवा शिंदे गटाकडे असलेले धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर एकनाथ शिंदे यांच्यासह त्यांच्या गटाचे आमदार हे भाजपमध्ये विलीन होतील अशी माहिती आहे. त्यामुळे आता विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर काय निर्णय घेणार याकडे देखील भाजपचे लक्ष असणार आहे.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button