धक्कादायक! देशात गेल्या २४ तासांत ६५६ नवीन कोरोना रूग्णांची नोंद

Covid-19 Cases : देशात कोरोनाच्या नवीन व्हेरियंटमुळे डोकेदुकी वाढली आहे. देशात गेल्या २४ तासांत ६५६ नवीन कोरोना रूग्णांची नोंद झाली आहे. आरोग्यमंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, देशात सध्या एकूण ३,७४२ सक्रिय कोरोना रूग्ण आहेत. केरळमध्ये सर्वाधिक १२८ रूग्ण आढळले आहेत.
जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) आपल्या अहवालात म्हटलं आहे की, २० नोव्हेंबर ते १७ डिसेंबर दरम्यान कोरोनाच्या एकूण ८,५०,००० हून अधिक नवीन प्रकरणांची नोंद झाली आहे. दरम्यान, जगभरात गेल्या २८ दिवसांच्या तुलनेत कोरोना रुग्णांच्या मृत्यूमध्ये ८ टक्क्यांची घट झाली आहे, यामध्ये ३००० हून अधिक रुग्णांचा मृत्यू झाला आहेत.
हेही वाचा – राष्ट्रवादीच्या विकास कामांमुळे पिंपरी-चिंचवड ‘रोल मॉडेल’ : युवक राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण
आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, ३० नोव्हेंबरपासून ठाणे शहरात २० रुग्णांचे नमुने घेण्यात आले, त्यापैकी जेएन.1 प्रकाराचे ५ रुग्ण आढळले आहेत. ठाण्यात सध्या कोरोनाचे २७ सक्रिय रुग्ण आहेत. महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यातही कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. महाराष्ट्राशिवाय कर्नाटक, तामिळनाडू, केरळ आणि गोव्यातही कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहेत.




