Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडी

पाकिस्तानच्या हवाई तळावर दहशतवादी हल्ला; तीन हल्लोखोर ठार

मुंबई : पाकिस्तानच्या मियांवली येथील पाकिस्तानी हवाई दलाच्या प्रशिक्षिण हवाई तळावर शनिवारी पहाटे मोठा दहशतवादी हल्ला झाला आहे. या हल्ल्याचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आले आहेत. पाकिस्तानी लष्कराचा हवाला देत हल्ल्याला प्रत्युत्तर देताना तीन हल्लेखोर ठार झाल्याची माहिती मिळत आहे.

पाकिस्तानच्या मियांवली भागातील हवाई तळात शिरण्यासाठी आत्मघातकी हल्लेखोर शिडी चढून आत शिरले. त्यांच्याकडे अत्याधुनिक शस्त्रे होती. त्यांच्याकडून हल्ल्याला सुरुवात होताच पाकिस्तानी लष्करानेही प्रत्युत्तरादाखल कारवाई सुरू केली. या कारवाईत तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले असून तिघांना ताब्यात घेण्यात आलं आहे.

हेही वाचा – छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेलांना महादेव ॲपच्या प्रवर्तकांनी ५०८ कोटी दिले; ED चा दावा 

दरम्यान, देशातील दहशतवाद्यांचा बिमोड करण्याकरता पाकिस्तानी सशस्त्र दल कटिबद्ध आहे, असंही पाकिस्तानी लष्कराने म्हटलं आहे. काही तासांपूर्वी बलुचिस्तान आणि खैबर पख्तुनख्वामध्ये दहशतवादी हल्ला झाला होता. या हल्ल्यात १७ जणांचा मृत्यू झाला आहे.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button