Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

‘शिवसेनेचं एकच तत्व, साहेबांचं हिंदुत्व’; शिंदे गटाच्या दसरा मेळाव्याचा टीझर जारी

मुंबई : शिवसेनेत फूट पडल्यापासून दोन्ही गटांकडून स्वतंत्रपणे ‘दसरा मेळावा’ साजरा केला जात आहे. गेल्यावर्षी दसरा मेळाव्यासाठी शिवतीर्थ मैदान मिळावं, यासाठी शिवसेनेच्या दोन्ही गटांनी अटीतटीचे प्रयत्न केले होते. अखेर मुंबई महापालिकेनं ठाकरे गटाला शिवतीर्थ मैदानात सभा घेण्याची परवानगी दिली. यंदाही शिवतीर्थ मैदान ठाकरे गटालाच मिळालं आहे. तर शिंदे गटाचा दसरा मेळावा आझाद मैदानावर होणार आहे.

शिंदे गटाकडून दसरा मेळाव्याचा पहिला टीझर जारी केला आहे. २४ ऑक्टोबरला सायंकाळी पाच वाजता हा मेळावा होणार आहे. या टीझरमध्ये शिंदे गटाने बाळासाहेब ठाकरे, हिंदुत्व आणि हिंदुत्वाच्या वाचारांना केंद्रस्थानी ठेवलं आहे. यात बाळासाहेब ठाकरे यांच्या जुन्या भाषणाचे ऑडिओही जोडला आहे. तसेच बेधडक घणाघाती शब्द मांडणाऱ्या हिंदूह्रद्यसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचा मेळावा, असा उल्लेख करण्यात आला आहे.

हेही वाचा – कंत्राटी भरतीचा जीआर रद्द; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

याव्यतिरिक्त ही फक्त आणि फक्त बाळासाहेबांच्या विचारांची शिवसेना आहे. तुम्हा तमाम शिवसैनिकांची ही शिवसेना आहे, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या आवाजात म्हटलं आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button