गुप्तांगात सोने असलेली कॅप्सुल लपवून तस्करीचा प्रकार उघड

गुप्तांगात सोने असलेली कॅप्सुल लपवून तस्करीचा प्रकार उघड

पुणे : सोन्याची भुकटी असलेली कॅप्सुल गुप्तांगात लपवून तस्करी करण्याचा प्रकार केंद्रीय सीमाशुल्क विभागाने (कस्टम) उघडकीस आणला. पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर दोघांना कस्टमच्या पथकाने पकडले असून, त्यांच्याकडून ३३ लाख ३३ हजार रुपयांची ५५५ ग्रॅम सोन्याची भुकटी जप्त करण्यात आली आहे.

पुणे आंतराष्ट्रीय विमानतळावर दुबईहून आलेले दोन प्रवासी घाईघाईने बाहेर पडण्याचा प्रयत्न करत होते. विमानतळावरील कस्टम अधिकाऱ्यांनी त्यांच्या हालचाली टिपल्या. दोघांना संशयावरुन ताब्यात घेतले. त्यांची चौकशी करण्यात आली. तेव्हा दोघांनी गुप्तांगात सोन्याची भुकटी असलेल्या कॅप्सुल लपविल्याचे उघडकीस आले. कॅप्सुलमधील ५५५ ग्रॅम सोन्याची भुकटी जप्त करण्यात आली. जप्त केलेल्या सोन्याची किंमत ३३ लाख ३३ हजार असल्याची माहिती कस्टमच्या अधिकाऱ्यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *