Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

अजित पवारांची मोठी खेळी! थेट राष्ट्रवादी पक्ष आणि पक्षचिन्हावर दावा

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून बंडखोरी करत थेट पक्ष आणि पक्षचिन्हावर दावा केला होता. दरम्यान, अजित पवार यांनीही एकनाथ शिंदेच्या मार्गाने जाण्याचा निर्णय घेतला आहे. अजित पवार यांनी राष्ट्रवादी पक्षातून बंडखोरी करत शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, अजित पवार यांनी पक्ष आणि पक्षचिन्हावर दावा करत निवडणूक आयोगाकडे याचिका दाखल केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ३० जून २०२३ तारीख असलेले पत्र निवडणूक आयोगाला ५ जुलै रोजी प्राप्त झाले आहे. यामध्ये १९६८ च्या पॅरा १५ अंतर्गत एक याचिका प्राप्त झाली आहे. ३० खासदार आमदार आणि एमएलसी यांची ४० प्रतिज्ञापत्रे या याचिकेतून करण्यात आली आहेत. तसंच, अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड करण्याचा ठरावही निवडणूक आयोगाला प्राप्त झाला आहे.

हेही वाचा – सुप्रिया सुळेंचा अजित पवारांना टोला; म्हणाल्या, वय हा केवळ आकडा..

https://twitter.com/ANI/status/1676525771064774656?

दरम्यान, शरद पवार यांच्या गटाने अजित पवार यांच्यासह शपथ घेतलेल्या नऊ आमदारांचं सदस्यत्व रद्द करण्याची मागणीही केली आहे. महाराष्ट्र विधानसभेच्या नऊ सदस्यांना अपात्र ठरवण्यासाठी सक्षम प्राधिकाऱ्यासमोर अपात्रतेची कार्यवाही करावी, अशी मागणी करणारे कॅव्हेट जयंत पाटील यांनी ४ जुलै रोजी निवडणूक आयोगाला पाठवले होते.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button