Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

‘संभाजी भिडेंना देशद्रोहाच्या आरोपाखाली अटक करा’; छगन भुजबळ यांची मागणी

मुंबई : १५ ऑगस्ट हा खरा स्वातंत्र्य दिवस नाही. याच दिवशी देशाची फाळणी झाली होती. त्यामुळे सर्वांनी या दिवशी उपवास करावा. या दिवशी दुखवटा पाळावा, असं वादग्रस्त विधान शिवप्रतिष्ठान संघटनेचे संस्थापक संभाजी भिडे यांनी केलं होतं. त्यांच्या या विधानानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

छगन भुजबळ म्हणाले की, संभाजी भिडे खरे म्हणजेच मनोहर भिडे यांना देशद्रोहाच्या आरोपाखाली अटक करायला पाहिजे. कारण त्यांनी सांगितलं की, १५ ऑगस्ट हा भारताचा स्वातंत्र्य दिन नाही. आपला लोकप्रिय असलेला तिरंगा झेंडा हा आपला राष्ट्रध्वज नाही.

हेही वाचा – ODI World Cup २०२३ : भारत-पाकिस्तान सामन्याला मनसेचा विरोध

जन गण मन हे आपलं राष्ट्रगीत नाही. परंतु असं वक्तव्य दुसऱ्या कोणी केलं असतं. तर त्याला आत्तापर्यंत देशद्रोहाच्या आरोपाखाली ताबडतोब अटक केली असती. मनोहर असलेलं नाव बदलून संभाजी असं नाव लावतात आणि बहुजन समाजाच्या पोरांना फितवायचं काम करतात, असंही छगन भुजबळ म्हणाले.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button