Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण
साताऱ्यात राष्ट्रवादीला मोठा धक्का! आमदार शशिकांत शिंदे यांच्या भावाचा शिवसेनेत प्रवेश

सातारा : राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शशिकांत शिंदे यांचे बंधू ऋषिकांत शिंदे यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला आहे. या प्रवेशामुळे साताऱ्यात राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.
हेही वाचा – WTC Final ला पाऊस आला तर काय? जाणून घ्या ICC चा नियम

मुंबईत वर्षा बंगल्यावर हा ऋषीकांत शिंदे यांनी काही कार्यकर्त्यांनी पक्ष प्रवेश केला. यावेळी नवी मुंबई शिवसेना जिल्हाप्रमुख विजय चौगुले, झोपडपट्टी पुनर्वसन विकास राज्यमंत्री दर्जा विजय नाहटा, वाशी नवी मुंबई शिवसेना संपर्कप्रमुख मा.नगरसेवक किशोर पाटणकर तसेच घणसोली विभागातील ऋषिकांत शिंदे यांच्यावर प्रेम करणारे असंख्य कार्यकर्तेसह शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला.





