शरद पवारांचा अध्यक्षपदाचा राजीनामा मागे घेण्याचा निर्णय

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी गेल्या काही दिवसांपुर्वी पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. शरद पवार यांनी आपला निर्णय मागे घ्यावा अशी मागणी कार्यकर्त्यांकडून केली जात होती. दरम्यान, कार्यकर्ते आणि नेत्यांच्या आग्रहानंतर शरद पवारांनी राजीनामा देण्याचा निर्णय मागे घेतला आहे.
शरद पवार म्हणाले की, मी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतल्यानंतर तीव्र भावना उमटल्या. तसेच मी निर्णयाचा पुनर्विचार करावा म्हणून झाले हितचिंतक, माझ्यावर प्रेम आणि विश्वास असणारे कार्यकर्ते, असंख्य चाहते यांनी संघटीत होऊन एकमुखाने आवाहन केलं.
देशभरातून विशेषत: महाराष्ट्रातून विविध राजकीय पक्षाचे नेते आणि सहकारी, मी अध्यक्षपदाची जबाबदारी पुन्हा घ्यावी, अशी विनंती केली. लोक माझे सांगाती, हेच माझ्या परीने प्रदीर्घ सार्वजनिक जीवनाचे गमक आहे. माझ्याकडून आपल्या भावनाचा अनादर होऊ शकत नाही, असंही शरद पवार म्हणाले.




