Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारणराष्ट्रिय

‘अजित पवारांना अध्यक्षपद देण्यात येऊ नये’; माजी मंत्री शालिनीताई पाटील

अजित पवारांवर भाजपच्या मोठ्या नेत्याचा हात आहे

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. राष्ट्रवादीची धुरा आता कोणाकडे सोपवली जाणार याची चर्चा सध्या सुरू आहे. दरम्यान, महाराष्ट्राचे माजी दिवंगत मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या पत्नी माजी मंत्री शालिनीताई पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

शालिनीताई पाटील म्हणाल्या की, शरद पवारांच्या आमदारांचे म्हणणे आहे की असे अचानक निघून जाणे चुकीचे आहे. योग्य पर्याय जोपर्यंत समोर येत नाही तोपर्यंत शरद पवारांनी निवृत्ती घेऊ नये. हा निर्णय त्यांनी घाईत घेतला आहे. मी आज ९० वर्षांची आहे. तरी लोक मला निवृत्ती घेऊ देत नाही. शरद पवार तर माझ्यापेक्षा १० वर्षांनी लहान आहेत.

अजित पवार यांना अध्यक्षपद देण्यात येऊ नये. जरंडेश्वर कारखान्यात अजित पवार यांनी १४०० कोटींचे मनी लॉड्रिंग केले आहे. मला हा प्रश्न पडला आहे, हसन मुश्रीफ यांच्यावर १०० कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप आहे. यांची ईडीने चौकशी केली मात्र अजूनपर्यंत अजित पवारांना का बोलावले नाही? कारण अजित पवारांवर भाजपच्या मोठ्या नेत्याचा हात आहे. त्यामुळे अद्याप त्यांची चौकशी झालेली नाही. त्यामुळे अध्यक्षपद हे सुप्रिया सुळेंनाच द्यायला हवे, असं शालिनीताई पाटील म्हणाल्या.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button