Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणेमहाराष्ट्रराजकारण

पुणे जिल्ह्यातील ग्रामपंचायत पोटनिवडणूक कार्यक्रम जाहीर

ग्रामपंचायत सदस्य आणि सरपंचाच्या रिक्त पदासाठी १८ मे रोजी मतदान

पुणे : जिल्ह्यातील सुमारे १९५ ग्रामपंचायतीतील २८० सदस्य आणि १० थेट सरपंचांच्या रिक्तपदांच्या पोटनिवणुकांसाठी १८ मे रोजी मतदान होणार आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी हिम्मत खराडे यांनी दिली आहे.

निधन, राजीनामा, अनर्हता किंवा अन्य कारणांमुळे रिक्त झालेल्या सदस्य आणि थेट सरपंचपदांच्या पोटनिवडणुकांसाठी राज्य निवडणूक आयोगाने घोषित केलेल्या कार्यक्रमानुसार हे मतदान होत आहे. नामनिर्देशनपत्र २५ एप्रिल ते २ मे २०२३ या कालावधीत सकाळी ११ ते दुपारी ३ पर्यंत दाखल करता येतील. २९ एप्रिल, ३० एप्रिल आणि १ मे या सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नामनिर्देशनपत्र दाखल करता येणार नाहीत.

नामनिर्देशनपत्रांची छाननी ३ मे रोजी सकाळी ११ वाजेपासून होईल. नामनिर्देशनपत्रे ८ मे रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत मागे घेता येतील. त्याच दिवशी दुपारी ३ वाजेनंतर अंतिमरित्या निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात येईल आणि निवडणूक चिन्हांचे वाटप करण्याच येईल. १८ मे रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत मतदान होईल. मतमोजणी १९ मे रोजी होईल.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button