Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपुणेमहाराष्ट्रमुंबईराजकारणराष्ट्रिय

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना जीवे मारण्याची धमकी

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. ११२ हेल्पलाईन क्रमांकावर हा फोन आला होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना उडवून टाकण्याची धमकी देणारा फोन मुंबई पोलिसांना आला आहे. यामुळे पोलीस यंत्रणा अलर्ट झाली आहे.

मी एकनाथ शिंदे यांना उडवणार आहे, असं बोलून कॉल कट करण्यात आला. नागपूरमध्ये हा कॉल आला असल्याचं समोर आलं आहे. पोलिसांनी फोन कोठून आला आहे, त्याचा शोध घेतला असता हो फोन पुण्यातील वारजे येथून आल्याचं समजलं आहे.

दरम्यान, यापुर्वी भाजप नेते नितीन गडकरी यांना कारागृहातून धमकीचा फोन आला होता. त्यानंतर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनाही धमकीचा फोन आला होता. आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना धमकी आली आहे.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button