Covid-19 : देशात पुन्हा मास्क सक्ती होणार?

Covid-19 : देशात पुन्हा मास्क सक्ती होणार?

राज्यासह देशात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. सध्या सक्रीय रुग्णांची संख्या २५ हजारांपेक्षा जास्त झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविय यांनी आज महत्त्वाची बैठक बोलावली आहे. या बैठकीत ते सर्व राज्यातील आरोग्य मंत्र्यांशी ऑनलाईन संवाद साधणार आहेत. यामुळे देशात पुन्हा मास्क सक्ती होईल का? किंवा कोणते नवे निर्बंध लावले जातात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

देशात गेल्या २४ तासांत तब्बल ५,३३५ नवीन कोरोना रूग्ण सापडले आहेत. राज्यात ही कोरोना रूग्णाची सख्या दुप्पट झाली आहे. गेल्या २४ तासांत ८०३ नव्या रूग्ण सापडले आहेत. तर ३ रूग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यात १.८२ % मृत्यूदर आहे.
राज्यात आजपर्यंत एकूण ७९,९५,२३३ कोरोना बाधित रूग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रूग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८.१३% इतकं झालं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *