Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्र

राज्यात लवकरच डी.एड कॉलेज बंद होणार?

D. Ed Course : राज्यातील सर्व अकृषिक विद्यापीठांमध्ये जून २०२३-२४ पासून नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी होणार आहे. आता बारावीनंतर ४ वर्षांच्या पदवी अभ्यासक्रमात शिक्षणशास्त्र विषय घेऊन विद्यार्थ्यांना ‘बीएड’च करावे लागणार आहे. त्यात स्पेशलायझेशन असणार आहे.

नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार, ‘पीजी’ केलेल्या विद्यार्थ्यांना एक वर्षात बीएड करता येईल. तर पदवी घेतलेल्यांना २ वर्षे तर बारावीनंतर बीएडसाठी ४ वर्षे लागणार आहेत. नवीन धोरणात ‘डीएड’ नसून आता प्राथमिक व माध्यमिक शिक्षक होण्यासाठी ‘बीएड’च करावे लागणार आहे. पण, विषय निवडताना कोणता शिक्षक व्हायचे, त्यावरून विषय घेता येणार आहेत.

नवे शिक्षण प्रशिक्षण टप्पे कधी सुरू होणार?

या संदर्भात शिक्षण विभागाकडून अधिकृतरित्या जाहीर केले गेले नाही. येत्या शैक्षणिक वर्षांपासून अंमलबजावणी करण्याबाबत चाचपणी सुरू असल्याची माहिती आहे. डीएड कोर्स मोडीत निघणार असल्याने या पदविकाधारकांचा प्रश्न सरकारला सोडवावा लागणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Join WhatsApp Group