Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपुणेमहाराष्ट्रराजकारणराष्ट्रिय

अदजितदादा मला माफ करा..! गौतमीने हात जोडून मागितली अजित पवारांची माफी

माझ्या सुधारणावादी वागण्यावर कुणीच का बोलत नाही?

पुणे : गौतमी पाटील हे नाव कायम चर्चेचा विषय राहिलेलं आहे. अश्लील नृत्यामुळे काही दिवसांपासुन हे नाव अनेक वादात आहे. दरम्यान, विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या मंचावर नर्तिका गौतमी पाटील हिला बोलीवू नका, असं कार्यकर्ते-पदाधिकाऱ्यांना सांगितले आहे. यावरून आता गौतमी पाटील हिने प्रतिक्रिया दिली आहे.

राष्ट्रवादीने गौतमी पाटीलच्या नृत्यावर बंदी घातल्यानंतर खुद्द गौतमीनेच प्रतिक्रिया दिली आहे. यापुर्वी माझ्याकडून अनेक चुका झाल्या. मात्र लोकांनी माझ्या चुका लक्षात आणून दिल्यानंतर मी त्या सुधारल्या. तेव्हापासुन माझ्या नृत्यावर आक्षेप घेतले जात नाहीत. तेव्हापासून मी आश्लील नृत्य तसेच वादग्रस्त हावभाव करत नाही. पण तरीही माझ्याकडून काही चुकलं असेल तर दादा मला माफ करा, असं गौतमीने म्हटलं आहे.

अजितदादा खूप मोठे आहेत. त्यांना मी काहीही बोलू शकत नाही. पण जेव्हा जेव्हा मी चुकले तेव्हा माफी मागितली. पण अजूनही काही लोक मला ट्रोल करतायेत. ते कोण लोक आहेत, हे मला माहिती नाही. माझ्यात सुधारणा होऊनही माझ्या वागण्याची कुणीच दखल का घेत नाही? माझ्या सुधारणावादी वागण्यावर कुणीच का बोलत नाही? असा सवाल गौतमीने यावेळी उपस्थित केला.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button