Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबई

संजय राऊत उद्धव व रश्मी ठाकरे यांच्याबद्दल वेगवेगळ्या गोष्टी सांगायचे; नारायण राणेंचा आरोप

संजय राऊतांनी शिवसेना वाढवली नाही, तर शिवसेना संपवली
पुणे : केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते नारायण राणे यांनी शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. संजय राऊत मला उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांच्याबद्दल वेगवेगळ्या गोष्टी सांगत असत त्या जर मी त्यांना ऐकवल्या तर ते राऊतांना चपलीने मारतील, असा आरोप नारायण राणे यांनी संजय राऊत यांच्यावर केला आहे.
एक गोष्ट मी आज सर्वांना सांगतो की, एक ना एक दिवस मी उद्धव ठाकरेंना भेटणार आहे. कशासाठी माहिती आहे का? कारण मी खासदार झाल्यानंतर राज्यसभेत संजय राऊत माझ्या बाजूला येऊन बसायचे. यावेळी ते उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांच्याबद्दल वेगवेगळ्या गोष्टी सांगायचे. ते ऐकलं तर उद्धव व रश्मी ठाकरे राऊतांना चपलीने मारतील, असं केंद्रीय मंत्री नारायण राणे म्हणाले.
संजय राऊतांनी शिवसेना वाढवली नाही, तर शिवसेना संपवली आहे. हा व्यक्ती मातोश्रीला सुरूंग लावणार आहे. ते ज्याच्या खांद्यावर हात टाकतात, तो खांदा गळलाच म्हणून समजा. असा हा विषारी प्राणी आहे. त्यामुळे मला पुन्हा संजय राऊतांबद्दल विचारू नका, असं नारायण राणे म्हणाले.
मला काम आहे. मी केंद्रीय मंत्री आहे. माझ्या अखत्यारित सहा कोटी तीस लाख उद्योजक आणि उद्योगपती आहेत. मी संपुर्ण राज्यात फिरतो आणि उद्योग, रोजगार वाढवण्याचं काम करतो. हा उद्योग संजय राऊतांना नाही, असंही नारायण राणे म्हणाले.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button