Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणेमहाराष्ट्रमुंबईराष्ट्रिय

कोण म्हणतेय अजितदादा नॉटरिचेबल… पाच दिवसांपासून गायब असलेल्या दादांचा नियोजित मावळ दौरा शुक्रवारपासून…

पुणे । महाईन्यूज । विशेष प्रतिनिधी ।


राष्ट्रवादीच्या शिर्डीच्या शिबिरातून अजित पवार आजोळी गेल्याचे सांगत, अजित पवार अचानक 5 दिवसांपासून नॉट रिचेबल झालेत. गेल्या पाच दिवसांपासून अजित पवार कोणाच्याही संपर्कात नसल्याची माहिती समोर येत होती. मात्र गुरुवारी राष्ट्रवादीकडून अजितदादांचा मावळ दौरा अधिकृतपणे जाहिर करण्यात आला आहे. त्यामुळे अजितदादा पाच दिवसांच्या राजकीय विश्रांतीनंतर पुन्हा सक्रिय झाल्याची चर्चा राजकीय गोटात पुन्हा सुरू झाली आहे.

विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसच्या राज्यस्तरीय अधिवेशनालाही स्वतः शरद पवारांनी रुग्णालयातून शिर्डीत हेलिकॉप्टरने येत हजेरी लावली होती. परंतु त्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिर्डीतील राज्यस्तरीय शिबिरानंतर अजितदादा कुठेही दिसलेले नाहीत. नेहमीच मीडिया आणि बातम्याच्या गराड्यात राहणारे अजित पवार अचानक पाच दिवस गायब झाल्याने नव्याच चर्चांना उधाण आले होते. मात्र मावळ दौर्याच्या अधिकृतपणे घोषणेने या सर्व चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.

अजितदादा शुक्रवारी, 11 नोव्हेंबर रोजी सकाळी 10.30 वाजता टीजीएच ऑन्को-लाईफ कॅन्सर सेंटर, तळेगाव येथे उद्घाटन समारंभास उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर 11.30 वाजता कामशेत येथे इंद्रयणी भात खरेदीचा शुभारंभ अजित दादांच्या हस्ते करण्यात येणार आहे.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button