TOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीराष्ट्रिय

दिल्लीच्या नरेलामध्ये प्लास्टिक फॅक्टरीला भीषण आग; दोघांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी

नवी दिल्ली ।

राजधानी दिल्लीतील नरेलामध्ये एका फुटवेअर फॅक्ट्ररीला भीषण आगाची घटना घडली आहे. या आगीत दोघांचा होरपळून मृत्यू झाला आहे.तर अनेक कामगार गंभीर जखमी झाले आहेत. जखमी कामगारांना तात्काळ उपचारांसाठी रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. या सर्वांची प्रकृती स्थिर आहे. या आगीत मृत्यू झालेल्या कामगारांची ओळख पटवली जात आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, नरेला भागात सकाळी 9.35 वाजता एका फॅक्टरीमध्ये भीषण आगीची घटना घडली. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 10 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. फॅक्टरीच्या पहिल्या आणि दुसऱ्या मजल्यावर ही आग लागली, मात्र आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. जवळपास दोन तास ही आग धुमसत होती.

या भीषण आगीच्या घटनेत अनेक जण होरपळून निघाले आहेत. अग्निशमन दलाच्या जवानांनी तिघांना सुखरुप बाहेर काढले आहे. दरम्यान मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यात आत्तापर्यंत दोघांचा मृत्यू झाला आहे. ही आग नेमकी कशी लागली याचा पोलिसांकडून तपास सुरु आहे.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button