पिंपरी-चिंचवड महापालिकेत हॅलो, हाय आता नाही… ‘‘वंदे मातरम्’’

पिंपरी-चिंचवड महापालिकेत हॅलो, हाय आता नाही… ‘‘वंदे मातरम्’’

पिंपरी : राज्य शासनाने आता दूरध्वनी किंवा समोरासमोर बोलताना ‘‘हॅलो, हाय’’ ऐवजी वंदे मातरम म्हणण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्या संदर्भातील आदेश पिंपरी-चिंचवड महापालिकेला 3 आॅक्टोबरला प्राप्त झाले असून, त्यानुसार विभागप्रमुखांना ‘‘वंदे मातरम्’’ म्हणण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
भारतीय स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर आजादी का अमृत महोत्सव साजरा होत आहे. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाचे औचित्य साधून शासकीय कार्यालयातील दूरध्वनी किंवा भ्रमणध्वनीवर अभयांगतांशी किंवा सहकारी अधिकारी व कर्मचारी यांच्याशी संभाषण करताना हॅलो ऐवजी वंदे मातरम या अभिवादनाने सुरवात करावी अशा सूचना शासनाच्या आहे.
शासकीय दूरध्वनी किंवा भ्रमणध्वनीवर संवाद साधताना वंदे मातरम म्हणणे आवश्यक तर आहेच त्याशिवाय खासगीरीत्यादेखील संवाद साधल्यास हॅलो ऐवजी वंदे मातरम म्हणावे अशा स्पष्ट सूचना आहेत. वंदे मातरम या अभिवादानात्मक शब्दाने सर्वांनी संभाषण तसेच सभेस सुरवात करण्यासाठी जाणीव जागृती व प्रचार प्रसिद्ध करण्याचे आवाहन देखील करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *