TOP News । महत्त्वाची बातमीUncategorizedताज्या घडामोडीमुंबई
दुरांतो एक्स्प्रेस खर्डी स्थानकाजवळ बंद पडल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत

मुंबई :दुरांतो एक्स्प्रेस खर्डी स्थानकाजवळ बंद पडल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. तांत्रिक बिघाडामुळे दुरांतो एक्स्प्रेस बंद पडल्याची माहिती आहे. मात्र त्यामुळे कसाऱ्याहून मुंबईकडे येणाऱ्या रेल्वे वाहतुकीचा मोठ्या प्रमाणात खोळंबा झाला असून प्रवाशांची गैरसोय होत आहे.
दुरांतो एक्प्रेसमध्ये झालेला तांत्रिक बिघाड लवकरात लवकर दूर करून वाहतूक सुरळीत करण्याचा आमचा प्रयत्न आहे, असं मध्य रेल्वेकडून सांगण्यात आलं आहे. मात्र रेल्वे वाहतूक उशिराने सुरू असल्याने सकाळी कामानिमित्त मुंबईकडे येत असलेल्या प्रवाशांना मोठा फटका बसल्याने संताप व्यक्त करण्यात येत असून ही वाहतूक तातडीने पूर्ववत करावी, अशी मागणी या प्रवाशांकडून केली जात आहे.





