टाळगाव चिखलीतील ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत पंढरपूर दर्शन

सामाजिक कार्यकर्ते विनायक आबा मोरे यांचा उपक्रम
सुमारे १ हजार २०० यात्रेकरुंची नाव नोंदणी
पिंपरी : टाळगाव चिखली परिसरातीलज्येष्ठ नागरिकांना मोफत पंढरपूर दर्शन घडवण्यात येणार आहे. त्यासाठी सुमारे १ हजार २०० यात्रेकरुंनी नाव नोंदणी केली आहे, अशी माहिती सामाजिक कार्यकर्ते विनायक आबा मोरे यांनी केला आहे.
सामाजिक कार्यकर्ते विनायक आबा मोरे यांच्या वाढदिवसानिमित्त ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत पंढरपूर दर्शन यात्रेचे नियोजन करण्यात आले आहे. उद्या दि. २ जून २०२२ रोजी यात्रा निघणार आहे. त्यासाठी नावनोंदणी करण्यात आली होती. त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
विनायक मोरे यांचे जनसंपर्क कार्यलय शॉप नं. १८, गोकुळम हौसिंग सोसायटी, पाटीलनगर चिखली येथे नागरिकांनी नाव नोंदणी केली असून, यात्रेत सहभागी होणाऱ्या यात्रेकरुंसाठी मतदान कार्ड, कोविड लसीकरणाचे दोन्ही डोस पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र अनिवार्य केले आहे. विशेष म्हणजे, ज्येष्ठ नागरिकांना या यात्रेमध्ये प्राधान्य देण्यात आले आहे.
विनायक आबा मोरे म्हणाले की, कोविडमुळे गेल्या दोन वर्षांत मंदिरे बंद होती. आता परिस्थिती नियंत्रणात आल्यामुळे मंदिरे दर्शनासाठी खुली करण्यात आली आहेत. त्यामुळे पांडूरंगाचे दर्शन व्हावे, असा आमचा संकल्प होता. त्या पार्श्वभूमीवर यात्रेचे नियोजन करण्यात आले आहे. भाजपा शहराध्यक्ष व आमदार महेश लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम हाती घेतला आहे.






