पिंपरी / चिंचवड

सासरच्यांवर दाखल केलेल्या केस मागे घेण्याची धमकी देत महिलेला मारहाण

पिंपरी l प्रतिनिधी

महिलेने तिच्या सासरच्या लोकांवर केस दाखल केल्या आहेत. त्या केस मागे घेण्याची धमकी देत सासरच्या लोकांनी महिलेला लोखंडी रॉडने मारहाण केली. ही घटना मंगळवारी (दि.29) दुपारी एक ते दीड वाजताच्या सुमारास आकुर्डी रेल्वे स्टेशन जवळ घडली.

अशपाक लियाकत शेख, हसीना लियाकत शेख, लियाकत इसाक शेख अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी महिलेने चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला मंगळवारी दुपारी एक वाजताच्या सुमारास गुरुद्वारा चौकातून घरी परत येत होत्या. त्यावेळी आरोपी पती अशपाक आणि अन्य दोघांनी येऊन फिर्यादी यांना ‘तू सर्व केस मागे घे. नाहीतर मी तुला बघून घेईल’ अशी धमकी दिली. फिर्यादी यांनी केस मागे घेण्यासाठी नकार दिला असता जवळच पडलेल्या लोखंडी रॉडने आरोपींनी फिर्यादी महिलेला डोक्यात, हातावर, कमरेवर मारहाण केली. तसेच पोटात लाथाबुक्क्या मारल्या. चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button