Breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

कॉम्प्रेसरच्या स्फोटात 3 कामगार भाजले, चाकण MIDC मधील घटना

Share On

आळंदी |

पुणे नाशिक महामार्गावर आळंदी फाटा येथील सोकीन इलेक्ट्रिकल – इंजिनिअरींग या कंपनी मध्ये अचानक कॉम्प्रेसरचा स्फोट होऊन तीन कामगार गंभीररित्या भाजल्याची घटना मंगळवारी (दि.29) सायंकाळी चारच्या सुमारास घडली. तातडीने या सर्व कामगारांना रुग्णालयात हलवण्यात आले. कंपनीतील आग तातडीने विझवण्यात आली.

घटनेनंतर कंपनीतील कामकाज बंद करण्यात आले होते. या बाबत संबंधित कंपनीच्या अधिकाऱ्यांकडून अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. दरम्यान चाकण पोलिसांनी रात्री उशिरा दिलेल्या माहिती नुसार तीन कामगार गंभीर भाजलेले असून वीरेंद्र बनवारी यादव (वय 28) अक्षय भीमराव केदारे वय 27 व शिवाजी नीळकंठ अप्पा मठपती ( वय 28, सर्व रा. मेदनकरवाडी, ता. खेड ) हे तिघे कॉम्प्रेसरचा स्फोट होऊन गंभीर भाजलेले असून त्यांच्यावर रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत. यातील वीरेंद्र यादव हा 80 टक्के भाजला असून, अक्षय केदारे 60 टक्के , तर शिवाजी मठपती 95 टक्के भाजला आहे. सर्वांवर उपचार सुरु आहेत.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button