TOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड
पाणीपुरवठ्यासाठी महापालिका घेणार 6 वॉटर टँकर

पिंपरी चिंचवड | पिंपरी-चिंचवड शहरातील वाड्या-वस्त्या, नवीन वसाहती, हौसिंग सोसायट्यांना अडचणीच्या प्रसंगी पाणीपुरवठा करणे, रस्त्यांचे दुभाजक आणि पदपथांच्या कडेच्या झाडांना पाणी देण्यासाठी महापालिका टँकरचा वापर करत असते. त्यासाठीच टाटा मोटर्स कंपनीकडून थेट पद्धतीने सहा टँकर घेण्याचे नियोजन प्रशासनाने केले आहे.
आठ हजार लिटर क्षमतेचे पाच आणि सहा हजार लिटर क्षमतेचा एक टँकर असेल. त्यांच्या खरेदीसाठी एक कोटी 49 लाख 15 हजार 400 रुपये खर्च येणार आहे. तसेच आरटीओ परवान्यासाठी प्रत्येकी दहा हजार रुपये असे 60 हजार रुपये शुल्क भरावे लागणार आहे. त्यामुळे एकूण एक कोटी 49 लाख 75 हजार 400 रुपये खर्च होणार आहे. नवीन टँकर ‘अ’, ‘क’, ‘इ’ आणि ‘फ’ क्षेत्रीय कार्यालयांना दिले जातील.





