TOP News । महत्त्वाची बातमीपिंपरी / चिंचवड
मंगळवारपासून पिंपरी-चिंचवड शहरातील ज्यूनिअर, सिनिअर केजीचे वर्ग भरणार

पिंपरी l प्रतिनिधी
कोरोनाचा पार्श्वभूमीवर बच्चे कंपनीचा शाळेतील किलबिलाट बंद झाला होता. मात्र कोरोना संसर्ग कमी झाला असल्याने हा किलबिलाट पुन्हा सुरू होणार आहे. मंगळवार (दि. 1, मार्च) पासून शहरातील शिशुवर्ग नियमितपणे सुरू होणार आहेत. याबाबतचे आदेश महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी दिले आहेत.
आयुक्त राजेश पाटील यांनी दिलेल्या आदेशात म्हटले आहे की, पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रातील सर्व माध्यमांच्या नर्सरी व ज्युनियर, सिनियर केजी (शिशुवर्ग) 1 मार्च 2022 पासून सुरू राहतील.
तसेच पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रातील सर्व उद्याने सकाळी सहा ते दहा आणि सायंकाळी चार ते आठ या वेळेत सुरू राहतील, असे देखील आदेशात म्हटले आहे.




