पिंपरी / चिंचवड

पिंपरीत चोरट्यांचा अमेरिकन डॉलरवर डल्ला

पिंपरी | प्रतिनिधी

पिंपरी येथे अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून युरो नोटा, अमेरिकन डॉलर आणि परदेशी नाणी चोरून नेली. ही घटना सोमवारी (दि. 27) सकाळी साडेनऊ वाजता उघडकीस आली.

शेखर विष्णुपंत भोंडे (वय 47, रा. शनिपार मंडई रोड, पुणे) यांनी याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे पिंपरी येथील घर 19 डिसेंबर सकाळी आठ ते 27 डिसेंबर सकाळी साडेनऊ या कालावधीत कुलूप लावून बंद होते. घराच्या गच्चीवरील दरवाजाला आतून लावलेली कडी अज्ञात चोरट्यांनी उघडली. तिथून घरात प्रवेश कारण एक फोटो प्रिंटर, एक व्हायोलिन, ब्ल्यूटुथ हेडफोन, दोन टेनिस रॅकेट, 32 हजार रुपये किमतीच्या सुरो नोटा, 18 हजार 500 रुपयांचे अमेरिकन डॉलर आणि एक हजार रुपये किमतीची परदेशी नाणी असा एकूण 55 हजार 800 रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी चोरून नेला. पुढील तपास पिंपरी पोलीस करीत आहेत.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button