Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीराष्ट्रिय
ओबीसी आरक्षणावर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी

नवी दिल्ली| टीम ऑनलाइन
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये ओबीसी समाजाला 27 टक्के आरक्षण देता येणार नाही, असे निर्देश गेल्या आठवड्यात सुप्रीम कोर्टाने दिले होते. ओबीसींचे आरक्षण स्थगित केल्यानंतर सुप्रीम कोर्टात हस्तक्षेप याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. या याचिकांवर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार होती. मात्र सोमवारी कामकाजाच्या यादीनुसार वेळेत काम पूर्ण होऊ न शकल्याने या प्रकरणी आज मंगळवारी दुपारी दोन वाजता सुनावणी होणार आहे. महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश या दोन्ही राज्यांच्या याचिका सुनावणीवेळी कोर्ट एकत्रित ऐकणार आहे.




