मध्य, पश्चिम, हार्बर रेल्वे मार्गांवर उद्या मेगाब्लॉक

मध्य, पश्चिम, हार्बर रेल्वे मार्गांवर उद्या मेगाब्लॉक

 

मुंबई – मध्य, पश्चिम आणि हार्बर या रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर उद्या रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यात ठाणे ते कल्याण, पनवेल ते वाशी आणि सांताक्रुज ते गोरेगाव दरम्यान रेल्वे मार्गांच्या दुरुस्ती आणि देखभालीचे काम रेल्वे करणार आहे. त्यामुळे लोकलच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. याची प्रवाशांनी नोंद घ्यावी, असे आवाहन रेल्वेने केले आहे.

मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर ठाणे ते कल्याण दरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावर ११ ते दुपारी ४ या वेळेत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. परिणामी या मार्गावरील धीम्या लोकल जलद मार्गावरून चालवण्यात येणार आहेत. त्यामुळे काही लोकल रद्द करण्यात आल्या असून काही विलंबाने धावणार आहेत. हार्बर रेल्वे मार्गावर पनवेल-वाशी दरम्यान आप आणि डाउन मार्गावर सकाळी ११.०५ ते दुपारी ४.०५ दरम्यान मेगाब्लॉक आहे. त्यामुळे पनवेल ते सीएसएमटी दरम्यानच्या लोकल रद्द केल्या आहेत. नेरुळ-खारकोपर दरम्यानची लोकल सेवाही बंद राहणार आहे.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते वाशी आणि ठाणे ते वाशी दरम्यानची लोकल सेवा सुरू राहणार आहे. पश्चिम रेल्वेच्या सांताक्रुज ते गोरेगाव दरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर सकाळी १० ते दुपारी ३ पर्यंत मेगाब्लॉक आहे. त्यामुळे या मार्गावरील जलद लोकल धीम्या मार्गावरून वळविण्यात येणार आहेत. यात काही लोकल रद्द केल्या असून काही विलंबाने धावणार आहेत, असे रेल्वेने प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *