Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीराष्ट्रिय

कोल्हापुर हादरले! सात वर्षाच्या मुलाचा नरबळी?; हळद कुंकू लावून फेकून देण्यात आला मृतदेह

कोल्हापुर |

कोल्हापुरात सात वर्षाच्या मुलाच्या हत्येमुळे खळबळ उडाली आहे. सात वर्षाच्या या चिमुरड्याचं अपहरण कऱण्यात आलं होतं. अपहरण केल्यानंतर त्याची हत्या करुन मृतदेह एका घराच्या मागे फेकून देण्यात आला. मृतदेहावर हळद कुंकू लावून टाकण्यात आल्याने हा नरबळीचा प्रकार असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. कोल्हापूरमधील कापशीमध्ये हा प्रकार घडला असून एकच खळबळ माजली आहे.

आरव केशव केशरे असं या सात वर्षाच्या चिमुरड्याचं नाव आहे. घराबाहेर खेळत असताना दोन दिवसांपूर्वी आरवचं अपहरण झालं होतं. यानंतर पोलिसांसोबतच गावकऱ्यांकडून आरवचा शोध घेतला जात होता. मात्र त्याचा शोध लागत नव्हता. त्यानंतर मंगळवारी पहाटे सहा वाजता गावापासून दूर असणाऱ्या एका जुन्या घराच्या मागे आरवचा मृतदेह सापडला. यावेळी त्याच्या शरीरावर हळद कुंकू लावलेलं होतं. यामुळे हा नरबळीचा प्रकार असावा अशी शक्यता गावकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे. शाहूवाडी तालुक्यातील कापशी गावातील या घटनेमुळे परिसर हादरला असून अनिसकडून निषेध करण्यात येत आहे. पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button