रिक्षा चालकाचे त्याच्याच रिक्षातून अपहरण, मारहाण आणि चोरी

रिक्षा चालकाचे त्याच्याच रिक्षातून अपहरण, मारहाण आणि चोरी

पिंपरी चिंचवड | रिक्षा घेऊन जात असलेल्या एका रिक्षा चालकाला दोघांनी मारहाण आणि शिवीगाळ केली. रिक्षा ताब्यात घेऊन रिक्षा चालकाचे अपहरण केले. त्यानंतर इंद्रायणी नदीच्या काठावर नेऊन चालकाला मारहाण करत त्याच्याकडील मोबाईल फोन, रोख रक्कम जबरदस्तीने रिक्षा चोरून नेली. ही घटना गुरुवारी (दि. 12) दुपारी एमआयडीसी भोसरी येथे घडली.

प्रसाद नवनाथ रेनगडे (वय 22, रा. ताथवडे) यांनी याबाबत एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दोन अनोळखी चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे रिक्षा चालक आहेत. ते त्यांची रिक्षा (एम एच 14 / एच एम 8543) घेऊन गुरुवारी दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास जय गणेश साम्राज्य चौकातून गंधर्वनगरीकडे जात होते. त्यावेळी दोन अनोळखी इसमांनी फिर्यादी यांना अडवले आणि रिक्षा ताब्यात घेतली. त्याच रिक्षातून आरोपींनी फिर्यादी यांना डुडुळगाव चौकातून इंद्रायणी नदीच्या काठावर नेले. तिथे मारहाण करून 10 हजार रुपये किमतीचा मोबाईल फोन, 500 रुपये रोकड आणि एक लाख 20 हजार रुपये किमतीची रिक्षा जबरदस्तीने फिर्यादी यांना नदीकाठी सोडून चोरून नेली. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *