आंतरराष्ट्रीयपुणे

मॉडर्न हायस्कूलच्या विद्यार्थ्यांना एसएससी बोर्ड गुणपत्रिका व शाळा सोडल्याचा दाखला वाटप

पुणे | प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे मॉडर्न हायस्कूल शिवाजीनगर पुणे 5 या प्रशालेत कोरोना नियमांचे पालन करत आज विद्यार्थ्यांना एसएससी बोर्ड गुणपत्रिका व शाळा सोडल्याचा दाखला वाटप करण्यात आले. प्रशालेची उत्तम निकालाची परंपरा कायम राखली.प्रवीण दत्तात्रय जरे याने 95 टक्के गुण मिळवून प्रशालेत प्रथम क्रमांक पटकावला व समाजशास्त्र विषयात त्याला 100 पैकी 100 गुण प्राप्त झाले.द्वितीय क्रमांक चिन्मय अशोक वाघमारे 94 टक्के ,तृतीय क्रमांक बागरेचा पवन 93.80%,व जाधव आदिनाथ रणजीत 93.80% यांनी मिळवला. यावेळी प्रत्येक तुकडीतील प्रथम क्रमांकाच्या विद्यार्थ्यांचाही सत्कार करण्यात आला.सत्कारात पुष्पगुच्छ,पेन,पेढे देऊन करण्यात आला.90 टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळवणारे एकूण 15 विद्यार्थी आहेत.याप्रसंगी कार्यक्रमास प्रशालेच्या मुख्याध्यापिका छाया आंधळे यांनी प्रास्ताविकात शाळेची माहिती दिली. उपमुख्याध्यापिका शारदा साबळे यांनी विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.शाळा समितीचे अध्यक्ष व संस्थेचे उपसचिव मच्छिंद्र कांबळे यांनी विद्यार्थ्यांना कौतुक पर शुभेच्छा दिल्या.या कार्यक्रमास पर्यवेक्षिका सीमा कुळधरण,वर्गशिक्षक अंबादास बारगजे,नवेश पाटील,दिनेश पवार,स्मिता पवार सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.कार्यक्रमाचे कौतुक प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे कार्याध्यक्ष प्रा.डॉ. गजानन एकबोटे व नगरसेविका पुणे मनपा व सहकार्यवाह प्रा.ज्योत्स्ना एकबोटे यांनी केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ईशानी ढेरे, यादी वाचन खंडू खेडकर, आभार निवृत्ती गोपाळे यांनी मानले.कार्यक्रम उत्साहात पार पडला.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button