Breaking-newsक्रिडाताज्या घडामोडी

खराब प्रदर्शनानंतर भारतीय हॉकी संघाचा स्पेनवर विजय

Share On

टोकियो – टोकियोमध्ये सुरू असलेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत भारताच्या हॉकी संघाने आजच्या दिवसाची सुरूवात चांगली केली आहे.खराब कामगिरीनंतर भारतीय हॉकी संघाने (TeamIndia) तिसऱ्या सामन्यात स्पेनवर ३-० असा विजय मिळवला आहे. भारतीय हॉकी संघाकडून रूपिंदर पाल सिंह याने दोन गोल तर सिमरनजीने एक गोल केली.

या विजयात भारतीय गोलरक्षक पीआर. श्रीजेशने महत्वाची भूमिका बजावली. स्पेनच्या संघाला आठ पेनल्टी कॉर्नरची संधी मिळून सुद्धा पदरी अपयश पडले. गोलरक्षक पीआर. श्रीजेशने स्पेनच्या संघाला खाते उघडू दिले नाही. भारताने ३-० अशी आघाडी कायम ठेवली.

गेल्यावेळी ऑस्ट्रेलियासोबत झालेल्या लढतीत भारताला लाजीरवाणा पराभव स्वीकारावा लागला. ऑस्ट्रलियाने भारताला ७-१ असे पराभूत केले होते.त्यापूर्वी न्यूझीलंडसोबत झालेल्या पहिल्या सामन्यात भारताने ३-२ असा विजय मिळवला होता.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button