Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीराष्ट्रिय

आजही इंधन दरवाढ; मुंबईत पेट्रोलची शंभरी, तर डिझेल 92 रुपये प्रति लिटर

मुंबई – कालच्या विश्रांतीनंतर आज पुन्हा एकदा पेट्रोल-डिझेल महागले आहे. आज देशात प्रति लिटर पेट्रोल आणि प्रति लिटर डिझेलच्या किंमतीत अनुक्रमे 24 आणि 29 पैशांची वाढ झाली आहे. या वाढीसह देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत पेट्रोलने शंभरी गाठली असून मुंबईत आज पेट्रोल 100.4 रुपये आणि डिझेल 91.87 रुपये प्रति लिटर इतके झाले आहे. दरम्यान, पश्चिम बंगाल, केरळ, आसाम आणि तामिळनाडू राज्यात झालेल्या निवडणुकांनंतर पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सातत्याने वाढ होत असून महिनाभरात झालेली ही चौदावी दरवाढ आहे.

आजच्या दरवाढीनंतर कोलकात्यात पेट्रोल 93.72 रुपये आणि डिझेल 87.46 रुपये, चेन्नईत पेट्रोल 95.28 रुपये आणि डिझेल 89.39 रुपये प्रति लिटर झाले आहे. तसेच महाराष्ट्रातील परभणीतही पुन्हा एकदा पेट्रोल-डिझेलचा भडका उडाल्याचे पाहायला मिळतेय. याठिकाणी आज पेट्रोल 23 पैसे, तर डिझेल 30 पैशांनी महागले आहे. त्यामुळे परभणीत पेट्रोलचा दर 102.32 रुपये प्रति लिटर आणि डिझेलचा दर 92.76 रुपये प्रति लिटर इतका आहे.

दरम्यान, मागील दोन महिन्यांत देशातील अनेक राज्यांत विधानसभा निवडणुका सुरू होत्या. त्यामुळे इंधन दर स्थिर असल्याचे पाहायला मिळाले होते. मात्र त्यानंतर इंधनाच्या दरात सातत्याने वाढ होत आहे.

 

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button