नॉनकोविड रुग्णांच्या उपचारासाठी स्वतंत्र व्यवस्था करा – नगरसेविका आशा शेंडगे

नॉनकोविड रुग्णांच्या उपचारासाठी स्वतंत्र व्यवस्था करा – नगरसेविका आशा शेंडगे

पिंपरी / महाईन्यूज

पिंपरी-चिंचवडमधील नॉनकोविड रुग्णांना उपचार देण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेने स्वतंत्र व्यवस्था करावी. त्यासाठी स्वतंत्र डॉक्टर्स आणि पॅरामेडिकल टीम कार्यान्वीत करावी, अशी मागणी नगरसेविका आशा शेंडगे यांनी केली आहे.

यासंदर्भात आयुक्त राजेश पाटील यांना निवेदन देण्यात आले आहे. त्यात शेंडगे यांनी म्हटले आहे की, कोविड 19 च्या रुग्ण संख्येत वाढ होत गेली तशी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने अनेक रुग्णालये हे पूर्ण कोविड रुग्णालये करण्यात आली आहेत. यामुळे शहरातील नॉन कोव्हीड रुग्णांचे जे आहेत त्यांची देखील गैरसोय झाल्याचं पाहायला मिळतंय. ज्यांना अर्धांग वायू, लिव्हरशी संबंधित आजार, किडनीशी संबंधित आजार, हृदयाशी संबंधित आजार तसेच फॅक्चर इत्यादी आजार असतील आणि ज्यांची आर्थिक परिस्थिती दुर्बल असेल, ज्या रुग्णांचे हातावरचे पोट असेल अशा लोकांची मोठी गैरसोय झाली आहे.

आर्थिक दृष्ट्या कमकुवत असणाऱ्या रुग्णांवर विनामूल्य उपचार करण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून कोणतीही सुविधा उपलब्ध करण्यात आलेली नाही. त्यामुळे नॉन कोविड रुग्णांसाठी आरोग्याची सुविधा लवकरात लवकर उपलब्ध करावी, अशी मागणी नगरसेविका आशा शेंडगे यांनी केली आहे.

गेल्या वर्षी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने यशवंतराव चव्हाण रुग्णालय पूर्णपणे कोविड रुग्णांसाठी करण्याचा निर्णय घेतला. सगळी व्यवस्था उभी केली. मागील लाटेमध्ये नॉन कोविड रुग्णांसाठी जशी व्यवस्था करण्यात आली होती, तशी व्यवस्था या लाटेमध्ये देखील करण्यात यावी, अशी मागणी नगरसेविका शेंडगे यांनी आयुक्त राजेश पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *