Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीराष्ट्रिय

केरळ राज्यात लॉकडाऊनची घोषणा

तिरुवनंतपुरम – भारतात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने अक्षरश: हाहाकार माजवला आहे. या लाटेशी सामना करण्यासाठी विविध राज्यांमध्ये निर्बंध लागू करण्यात येत आहेत. केरळ राज्यात पूर्ण लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. मुख्यमंत्री कार्यालयाकडून ट्विट करत देण्यात आलेल्या माहितीनुसार, कोरोना रुग्णसंख्या वाढत असल्याने राज्यात ८ मे रोजी सकाळी ६ वाजल्यापासून १६ मेपर्यंत लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे.

 

दरम्यान, केरळमध्ये बुधवारी सर्वाधिक ४१ हजार ९५३ नव्या रुग्णांची नोंद झाली होती. केरळचे मुख्यमंत्री पिनरायी विजयन यांनी केरळमधील स्थिती अत्यंत गंभीर असल्याचे सांगताना कोरोनाला रोखण्यासाठी कठोर निर्णय घेण्याची गरज असल्याचे म्हटले होते. राज्यातील स्थितीचा आढावा घेतल्यानंतर लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

 

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button