Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबई

भाजपा नेते आशिष शेलार कोरोना पॉझिटिव्ह

मुंबई– गेल्या काही दिवसांपासून राज्यात कोरोनाचा प्रकोप वाढत चालला असून सर्वसामान्यांपासून अनेक सेलिब्रिटी आणि राजकीय नेत्यांनाही कोरोनाची लागण झाल्याचे समोर येत आहे. भाजपा नेते, आमदार आशिष शेलार यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी स्वतः बुधवारी रात्री उशिरा ट्विटरवरून याबाबत माहिती दिली.

‘माझी कोविड 19ची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. मी औषधोपचार घेत असून जे कोणी माझ्या संपर्कात आले आहेत, त्यांनी स्वत:ला वेगळे ठेवावे आणि वैद्यकीय सल्ला घ्यावा. मी माझ्या कार्यालयामार्फत मुंबईकरांच्या मदतीसाठी उपलब्ध आहे’, असे ट्विट आशिष शेलार यांनी केले आहे.

राज्यात मागील तीन दिवसांपासून 50 हजारांच्या पुढे रुग्ण आढळून आले आहे. तर सध्या 6,12,070 कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहे. तसेच राज्यात आजपर्यंत एकूण 29,05,721 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आ

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button