‘माझा अभ्यास दांडगा, मला वनमंत्री करा’, आणखी एका नेत्याचे मुख्यमंत्र्यांना पत्र

यवतमाळ |
पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात आरोप झाल्यानंतर शिवसेनेचे नेते संजय राठोड यांनी वनमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. आता या पदासाठी शिवेसना नेत्यांमध्ये रस्सीखेच सुरू झाले आहे. अनेक नेते मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून याबाबत मागणी करत आहेत. आता संजय राठोड यांच्याच मतदारसंघातील दारव्हा नगरपरिषदेमधील शिवसेना नगरसेवकाने मंत्रीपदावर दावा केला आहे. रवी तरटे या शिवसेना नगरसेवकाने मुख्यमंत्र्यांना पत्र लिहित मंत्रीपदाची मागणी केली आहे. 5 वर्षांपासून शिवसेना निष्ठावंत म्हणून काम केले आहे. समाजकारणासह राजकारण या विषयावर चांगला दांडगा अभ्यास आहे, असे तरटेंनी पत्रात म्हटले आहे.
माझी मंत्रीमंडळात नियुक्ती केल्यास विदर्भाला मंत्रीमंडळात स्थान मिळेल. राठोड यांच्या राजीनाम्यामुळं रिक्त जागेसाठी पक्षात चढाओढ लागली आहे. विधानसभा मतदारसंघातील असून मला संजय राठोड यांचेही मार्गदर्शन लाभेल. माझ्या मागणीचा सहानुभूतीपूर्वक विचार करुन मला विधान परिषदेवर घेऊन वन खात्याचं मंत्रीपद द्यावं, असे त्यांनी पत्रात म्हटले आहे. दरम्यान, याआधी माजी खासदार हरिभाऊ राठोड यांनी देखील मुख्यमंत्री ठाकरेंन पत्र लिहित वनमंत्रीपदाची मागणी केली आहे.
वाचा- शरद पवारांच्या ‘त्या’ भाकितावर देवेंद्र फडणवीस म्हणाले…





