Breaking-newsताज्या घडामोडीमनोरंजन

अभिनेत्री धनश्री कडगांवकरला पुत्ररत्न

मुंबई – झी मराठी वाहिनीवरील ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेतून घराघरांत पोहोचलेली नंदीता म्हणजेच छोट्या पडद्यावरच्या वहिनीसाहेब अर्थात अभिनेत्री धनश्री काडगावकर हिने चाहत्यांसोबत एक खास बातमी शेअर केली आहे. धनश्रीच्या घरी चिमुकल्याचे आगमन झाले असून काल सकाळी तिने मुलाला जन्म दिला. सोशल मीडियावर रात्री उशिरा पोस्ट शेअर करत तिने आपल्या चाहत्यांना ही गोड बातमी दिली. तसेच ‘New life…New chapter’ असे कॅप्शन देत धनश्रीने ही पोस्ट शेअर केली आहे.

‘आज सकाळीच आम्हाला पुत्ररत्न प्राप्त झाले आहे. ही बातमी सांगताना मला खूप आनंद होत आहे. सर्वांच्या आशिर्वादाने मी आणि माझं बाळ आम्ही दोघेही सुखरुप आहोत. तुमच्या सर्वांचे आशिर्वाद आणि शुभेच्छा अशाच कायम राहो’, असे धनश्रीने तिच्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

https://www.instagram.com/p/CKl2mDth7am/?utm_source=ig_embed

 

धनश्रीने तिच्या नवऱ्याच्या वाढदिवसाचे औचित्य साधून तिच्या चाहत्यांना तिच्या प्रेग्नंसीची गोड बातमी दिली होती. तिच्या प्रेग्नंसीपासून धनश्री चांगलीच चर्चेत आली होती. तिच्या बाळाची सर्वांनाच उत्सुकता होती. धनश्री आणि तिचा नवरा दुर्वेश अखेर गुरुवारी सकाळी आई बाबा झाले आहेत.

दरम्यान, धनश्रीचे प्रेग्नंसीच्या काळातले अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. तिच्या डोहाळे जेवणाचे फोटोही समोर आले होते. ‘माझिया प्रियाला प्रित कळेना’ या मराठी मालिकेतून धनश्रीने अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवले. त्यानंतर गंध फुलांचा गेला सांगून, जन्मगाठ या मालिकांतून ती प्रेक्षकांसमोर आली होती. मात्र तुझ्यात जीव रंगला या मालिकेतून धनश्री घराघरात पोहचली. तिची वहिनीसाहेब ही भूमिका चांगलीच गाजली. २०१३ साली धनश्रीने दुर्वेशसोबत लग्नगाठ बांधली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Join WhatsApp Group