Breaking-newsपुणे
मनसे युवानेते प्रविण माळी यांच्या वाढदिवसानिमित्त वृद्धाश्रमात मोफत चष्मे वाटप व नेत्र चिकित्सा शिबीर

पुणे | प्रतिनिधी
मनसे युवानेते प्रविण माळी यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत चष्मे वाटप व नेत्र चिकित्सा शिबीर आयोजीत करण्यात आले होते. अभिनव रावेत सोशल फाऊंडेशनच्या मार्फत संत मोनी बाबा वृद्धाश्रम येथील सर्व वृद्धांची नेत्र चिकित्सा करण्यात आलेली आहे. तसेच मोफत चष्मे वाटप करण्यात आलेले आहे.
डॉ.सौरभ चावरे यांचे त्यांना उत्तम सहकार्य लाभलेले आहे. यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे पिं.चि.शहर अध्यक्ष हेमंतभाऊ डांगे, शहर सचिव अक्षय नाळे, भोसरी विधानसभा अध्यक्ष प्रतिक शिंदे इ. उपस्थित होते. प्रवीण माळी यांचा सामाजिक कार्यात नेहमीच खारी मोलाचा वाटा राहिलेला आहे.






