लग्नाला होकार दिला नाही तर तोंडावर अ‍ॅसिड फेकेन

लग्नाला होकार दिला नाही तर तोंडावर अ‍ॅसिड फेकेन

पुणे |महाईन्यूज|

तू माझ्याशी लग्न कर नाही तर तोंडावर अ‍ॅसिड टाकण्याची धमकी दिल्याचे दोन धक्कादायक प्रकार समोर आले आहेत. याप्रकरणी हडपसर व वारजे पोलिसांनी दोघा तरुणांवर गुन्हा दाखल केला आहे. महादेवनगर येथे राहणाऱ्या एका ३३ वर्षाच्या महिलेने हडपसर पोलिसांकडे फिर्याद दिली आहे.

त्यानुसार पोलिसांनी अरुण बाबासाहेब खडतरे (रा. त्रिदलनगर, येरवडा) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादी व आरोपी हे तोंड ओळखीचे आहेत. आरोपी हा २० आॅक्टोबर रोजी रात्री फिर्यादीच्या घरी आला. त्याने फिर्यादीशी जवळीक साधून तु माझ्याशी लग्न कर असे म्हणून तिचा विनयभंग केला. त्यावेळी फिर्यादीने आरडाओरडा केल्याने तिचे आई वडिल सोडविण्यासाठी आले. तेव्हा त्याने त्यांना मारहाण करुन ढकलून दिले.

लग्नाला हो म्हटली नाही तर तुझ्या वडिलांना खल्लास करुन टाकून तुझ्या तोंडावर अ‍ॅसिड फेकून जीवे ठार मारण्याची धमकी दिली. त्याने घरातील साहित्याची तोडफोड करुन काही साहित्य बरोबर घेऊन गेला. या प्रकाराने ते सर्व कुटुंब घाबरले होते. शेवटी त्यांनी बुधवारी हडपसर पोलिसांकडे धाव घेऊन फिर्याद दिली असून पोलीस तपास करीत आहेत.

दुसरी घटना शिवणे येथे घडली. याप्रकरणी एका २५ वर्षाच्या तरुणीने वारजे पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी मयुर सुरेश कुडले (वय ३०, रा. पोतनीस परिसर,कोथरुड) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.फिर्यादी व आरोपी हे ओळखीचे आहेत.आरोपी हा २७ आॅक्टोबर रोजी सायंकाळी फिर्यादीच्या सोसायटीत आला होता. त्याने फिर्यादीला तू लग्न करायचे नाहीस, तू फक्त माझे सोबत लग्न करायचे़ तू फक्त माझी आहेस. तू जर लग्न केलेस तर तुझ्या नवऱ्यास मी मारुन टाकीन, तुझ्या चेहऱ्यावर मी अ‍ॅसिड फेकेन, तु परत कोणास कधी तोंड दाखवू शकणार नाहीस, अशी धमकी दिली. या प्रकाराने फिर्यादी या घाबरुन तेथून निघून जाऊ लागल्यावर आरोपीने त्यांचा पाठलाग करुन त्यांच्याशी सलगी वाढविण्याचा प्रयत्न केला. वारजे पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपीचा शोध घेत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *