Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपुणे

आनंदाची बातमी, पुणे जिल्ह्यातील 502 गावं कोरोनामुक्त !

पुणे – कोरोनाच्या संकटात पुणे जिल्ह्यातील नागरिकांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. पुणे जिल्ह्यातील तब्बल 502 गावं पूर्णपणे कोरोनामुक्त झाली आहेत. तर अडीचशे गावांमध्ये कोरोनाचा शिरकावच झाला नसल्याची माहिती जिल्हा प्रशासनानं दिली आहे.

पुणे जिल्ह्यातील आकडेवारी पाहता ग्रामीण भागात कोरोनाच्या संसर्गाचं प्रमाण कमी करण्यात प्रशासनाला मोठं यश मिळाल्याचं दिसून येत आहे. सध्या पुणे जिल्ह्यात कोरोनाचे 13 हजार अॅक्टिव रुग्ण असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली आहे.

पुण्यात कोरोनातून बरे होऊन घरी जाणाऱ्या रुग्णांचे प्रमाणात मोठी वाढ होत आहे. बुधवारपर्यंत पुण्यात 5 हजार 427 बाधित रुग्ण होते. आतापर्यंत 2 हजार 875 रुग्णांना डिस्चार्ज दिला आहे. उपचार घेत असलेल्या रुग्णांपेक्षा बरे झालेल्या रुग्णांचे प्रमाण 596 अंकांनी जास्त आहे. 15 क्षत्रिय कार्यालयांपैकी पाच विभागात रुग्ण डिस्चार्ज होण्याच प्रमाणही जास्त आहे. कंटेनमेंट क्षेत्रातच बरे होण्याचे प्रमाण सर्वाधिक जास्त आहे. ढोले पाटील रस्ता इथं सर्वाधिक तब्बल 562 रुग्ण बरे झाले आहेत.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button