नवी दिल्ली: भारतातील कोरोना बाधितांनी 70 लाखांचा टप्पा पार केलेला असून मागील 24 तासांत 74,383 नवे रुग्ण आढळून आलेले आहेत. तर 918 जणांच्या मृत्यूची नोंद झालेली आहे. या नव्या भरीमुळे सध्या देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 70,53,807 वर पोहचला असून 8,67,496 अॅक्टीव्ह रुग्ण असून 60,77,977 जणांनी कोरोनावर मात केलेली आहे. तर एकूण 1,08,334 रुग्णांनी आपले प्राण गमावले आहेत. अशी माहिती आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आलेली आहे.




