चरसी नौटंकी कंगना को “Y ” सुरक्षा, गरीब की बेटी आग के हवाले, शिवसेनेचा मुंबईत मोर्चा

मुंबई | हाथरस सामूहिक बलात्कार प्रकरणानंतर देशभरातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. देशभरातून उत्तर प्रदेश सरकारविरोधात मोर्चे आणि घोषणाबाजी होतना दिसत आहे. शिवसेनेनेही शिवाजी पार्क ते दादर असा निषेध मोर्चा काढत पीडितेला न्याय देण्याची मागणी केली. शिवसेनेने ‘चरसी नौटंकी कंगना को “Y ” सुरक्षा, गरीब की बेटी आग के हवाले’ अशा घोषणा देत उत्तर प्रदेश आणि केंद्र सरकारला लक्ष्य केले. तसेच उत्तर प्रदेशमध्ये पोलिसांचे गुंडाराज सुरु असून राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणीही शिवेसेनेने केली.
मोर्चात सुरुवातीला शिवाजी पार्कमधील मीनाताई ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाला अभिवादन करण्यात आले. त्यानंतर मोर्चा दादरमधील चैत्यभूमीकडे वळवण्यात आला. यावेळी शिवसेना कार्यकर्ते तसेच मुंबईकरांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. मोर्चेकऱ्यांच्या हातात काळे झेंडे तसेच योगी आदित्यनाथ सरकारवर टीका करणारी फलकं झळकत होती.
यावेळी शिवसैनिकांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ तसेच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. ‘योगी सरकार हाय हाय, मोदी सरकार हाय हाय, युपी मे दु:ख गरीब बस्तीमे पोलीस दरिंदे मस्तीमे,’ अशा घोषणाबाजींनी दादर परिसर दुमदुमला होता.





