Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमुंबई

मुंबईत आणि महाराष्ट्रात फक्त एकच ब्रँड तो म्हणजे “छत्रपती शिवाजी महाराज” : निलेश राणे

Share On

मुंबई | प्रतिनिधी

संजय राऊत यांनी नुकतंच ठाकरे ब्रँड हा महाराष्ट्रातील स्वाभिमानाचा ब्रँड आहे असे वक्तव्य केले होते. यानंतर दुसरा महत्त्वाचा ब्रँड हा पवार नावाने चालतो आहे. मुंबईवर ताबा मिळवण्यासाठी या दोन ब्रांडस नष्ट करायचं असं कारस्थान उघड पडलं आहे असंही वक्तव्य यावेळी शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी केलं होतं. याच वक्तव्याला उत्तर म्हणून आता नितेश राणे या वादात पडले आहेत.

राज ठाकरे देखील ठाकरे ब्रँड असेच घटक आहेत. महाराष्ट्रात हाच ब्रॅंड महत्त्वाचा आहे. शिवसेनेसोबत मतभेद असले तरीदेखील या ब्रँडच्या नष्ट करण्याच्या वादात राज ठाकरेंना देखील याचा फटका बसणार आहे. असे वक्तव्य करून राऊतांनी नवीन वाद सुरू केला आहे.

यावर उत्तर देताना नितेश राणे यांनी महाराष्ट्रात फक्त एकच ब्रँड आहे आणि तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज! असे बोलून संजय राऊत यांना त्यांचे नाव न घेता टोला लावला आहे. आता यावर राऊत यांचे वाक्युद्ध असेच सुरू राहते की ते मूग गिळून गप्प बसतात हे पहावे लागेल.

नितेश राणे यांनी केलेल्या वक्तव्याला राऊत उत्तर देतील असे तरी वाटत नाही. कारण छत्रपती शिवाजी महाराजांचे जिथे नाव येतं तिथे सर्व जण फक्त मुजरा करू शकतात.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button