Breaking-newsराष्ट्रिय

दिल्लीतील निजामुद्दीन दर्गा उद्यापासून भाविकांसाठी खुला

नवी दिल्ली – राजधानी दिल्लीतिल प्रसिद्ध हजरत निजामुद्दीन दर्गा उद्या रविवार ६ सप्टेंबरपासून भाविकांसाठी खुला होणार आहे. दर्गा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी याबाबत शुक्रवारी माहिती दिली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाउनमुळे दर्गा बंद ठेवण्यात आला होता. मात्र, आता जरी तो खुला होत असला तरी या ठिकाणी कोरोना विषाणू संसर्ग आजारासंदर्भातील सर्व काळजी येथे घेतली जाणार असून सोशल डिस्टंसिंगचे पालनही केले जाणार आहे.

हजरत निजामुद्दीन दर्ग्याचे प्रभारी सय्यद आदिब निझामी म्हणाले, “दर्गा ६ सप्टेंबरपासून खुला होत आहे. दरम्यान, कोविड संदर्भात सरकारने जाहीर केलेल्या नियमांचे पालन करण्यासाठी आम्ही सर्व प्रकारची तयारी केली आहे. लॉकडाउनमध्ये आम्ही दर्गा बंद ठेवला होता. मात्र, आता सरकारच्या मार्गदर्शक तत्वांनुसार आम्ही दर्गा खुला करत आहोत.”

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button