Breaking-newsआरोग्य । लाईफस्टाईल

मधाचे गुणकारी फायदे जाणून घ्या

पदार्थांची गोडी वाढविणाऱ्या काही पदार्थांचे गुणकारी फायदेदेखील असतात. यातच मधाचाही समावेश आहे. भूक वाढविण्यापासून ते पचनशक्ती सुधारण्यापर्यंत मधात अनेक औषधी गुणधर्म असतात. आज आपण याबाबत जाणून घेऊया…

  • सर्वात महत्त्वाचे म्हणजे मधामुळे रक्त शुद्ध होते.
  • मधामुळे उच्च रक्तदाब नियंत्रणात येतो.
  • भूक न लागण्याची समस्या असल्यास मधाचे सेवन करण्याचा सल्ला दिला जातो. शिवाय मध हे पचनशक्ती वाढविण्यासही उपयुक्त ठरते.
  • सर्दी, खोकला, पडसे अशा आजारांत २ चमचे मध घातलेलं कोमट पाणी प्यायल्यास लगेच आराम मिळतो.
  • मधामुळे त्वचा तजेलदार राहते. तसेच केसांच्या वाढीसाठीही मध फायदेशीर आहे.
  • दररोज रिकाम्या पोटी एक ग्लास पाण्यात एक चमचा मध घालून प्यायल्यास खरुज किंवा त्वचेसंबंधित इतर तक्रारींवर आराम मिळतो.
  • मळमळ आणि पोटदुखीवर आल्याच्या किंवा लिंबाच्या रसात मध मिसळून पिण्याचा सल्ला दिला जातो.
Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button